विजयकुमार गायकवाड
तालुका प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर: विद्या प्रतिष्ठानअनंतराव पवार इंग्लिश मिडीअम स्कूल स्वामी चिंचोली येथील रोटरी इंटरॅक्ट क्लब आयोजित एक मूठ धान्’ या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाजातील संवेदनशीलता अजूनही टिकून आहे व ती दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे हे दाखवून दिले आहे. या उपक्रमात शाळेतील मुलांनी व पालकांनी सढळ हाताने एकूण १३ पोते धान्य जमा केले. यात गहू, तांदूळ, बाजरी व ज्वारी या धान्याचा समावेश आहे. हे जमा केलेले धान्य गोविंद वृद्धाश्रम, टेंभुर्णी यांच्या संचालकांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजीत भोंगळे म्हणाले की शाळेतील मुलांना सामाजिक बांधिलकी जपता यावी व गरजूंना मदत मिळावी, या उद्देशाने रोटरी क्लब व शाळेतील इंटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एक मूठ धान्य हा उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून दान केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दातृत्त्वाची भावना वाढीस लागावी व त्यांच्यात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हा उद्देश सफल झाला. रोटरी क्लब भिगवण हा उपक्रम गेली पाच वर्षापासून राबवत असल्याचे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज भाई शेख यांनी सांगितले तसेच रोटरी क्लब संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत यांनी उपक्रम समाजातील सर्व संस्थांनी राबवला तर अनाथ गोरगरीब लोकांना फार मोलाची मदत होईल असे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास रोटरी क्लबचे ,AG संजय खाडे व नूतन अध्यक्ष संतोष सवाने हे उपस्थित होते. इंटरॅक्ट क्लबच्या समन्वयक अर्चना जानकर व मोहिनी गावडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन या उपक्रमास लाभले.