सीआरपीएफ ३७ बटालियन द्वारे नागरी कृती कार्यक्रम
व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधि अहेरी
अहेरी तालुक्यातील कोठी या अत्यंत नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात दिनांक १४ डिसेंबर रोजी परिसरातील गरजू ,आदिवासी ग्रामस्थांना त्यांचे सतत जीवनमान सुधारण्यासाठी सी.आर.पी. एफ. च्या ३७ बटालियनने नागरी कृती कार्यक्रम अंतर्गत थंडीच्या दिवसात ब्लँकेटचे वाटप केले.सोबतच महिलांना सिलाई मशीन व तरुणांना खेळाचे साहित्य सुजित कुमार, व्दितीय कमान अधिकारी, ३७ बटा. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवकुमार राव, द्वितीय कमान अधिकारी, ३७ बटा. यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
यात अत्यंत गरीब आदिवासी १०० गरजू स्थानिक नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. जेणेकरून येत्या थंडीच्या हंगामात शाश्वत जीवन जगण्यास त्यांना मदत होईल. याशिवाय महिलांच्या उदरनिर्वाहासाठी २० शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. यातून कपडे शिवून आपल्या कुटुंबाचा आधार स्वतः बनून आत्मनिर्भर बनू शकतील. तसेच तरुणांना १५ व्हॉलीबॉल किट, २० क्रिकेट किट, ५३ कॅरम संच व गुणवंत तरुण-तरुणींना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमातून सीआरपीएफ बटालियनला आशा आहे की, नागरिकांना मदत करून अशा कार्यक्रमांचे आयोजन परिसरातील लोकांचा नक्षलवादापासून भ्रमनिरास करू शकतो . त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यात अशा उपक्रमाची मदत होईल अशी आशा बटालियनच्या कमांडंट यांनी व्यक्त केले. साहित्य मिळालेल्या सर्व नागरिक, महिला व तरुण तरुणींनी सीआरपीएफ ३७ बटालियन चे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला.या कार्यक्रमात ३७ बटालियनचे सहाय्यक कमांडंट रिजेश राज, रणजीत मट्टामी, पी.एस.आय. तथा अधिनस्त अधिकारी, जवान व पोलीस स्टेशन कोठीचे कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.