प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
दि.१४ डिसेंबर विविध मागण्यासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय पाथरी येथे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या आहारावर परिणाम होऊ नये याकरिता शासनाने पोषण आहार शिजवण्याची जबाबदारी बचत गट सामाजिक संस्था यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.. या निर्णयाचा बुधवारी पाथरी येथील आंदोलकांनी होळी करून निषेध केला. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या काळात त अंगणवाडी विद्यार्थ्यांना आहार शिजवण्यासाठी बचत गट आणि सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आंदोलकांमधून नाराजी व्यक्त होत असून .या आदेशाची अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर होळी केली. या आंदोलनात अंगणवाडी महिला कर्मचारी सुनीता धनले ,अशा दाभाडे ,सुलोचना चव्हाण, संगीता ढवळे ,शीला मनेरे, कुसुंबाई निंबाळकर ,अनिता खरात, अंजली ब्रह्मराक्षे ,जयश्री देशमुख ,उषा गिराम ,लता विखे, कमल कचवे, संगीता झोडपे, वैशाली खाकरे, कालींदा नाटकर ,स्वाती मुंडे ,गोकर्ण कदम ,चित्रा उघडे ,यांच्यासह आदी सहभागी झाले आहेत.







