अमृत कारंडे
तालुका प्रतिनिधी, जामखेड
जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सौ. प्रियंका गणेश पवार यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंच पदी सुनिता नानासाहेब कवादे. बावी गावच्या स्थानिक विकास कामात आमदारांचा हस्तक्षेप आणि सरपंच निलेश पवार यांच्या मनमानी विरोधात भावी ग्रामपंचायत सदस्यांनी 6/0 आशा बहुमताने अविश्वास ठरावाने तो मंजूर करण्यात आला. व मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच निलेश पवार यांची हकालपट्टी करत बावी ग्रामपंचायत सत्तेतून बाहेर केले व आज झालेल्या फेर निवडणुकीत आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वात बावी ग्रामपंचायत मध्ये सत्ता स्थापन केली. आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचे विश्वासू युवा नेते युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राम पवार यांची भाऊजयी सौ. प्रियंका गणेश पवार यांची बावी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अनेक नेते व तालुक्यातील व पंचक्रोशीतील पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब रघुनाथ मंडलिक, श्री महादेव पोपट कारंडे, सौ. मनीषा सुनील कारंडे, बायमाबाई गुलाब मंडलिक, यांनी उपस्थिती दाखवली तसेच यावेळी जुस्ते साहेब, तलाठी दिनेश वास्ते, ग्रामसेवक रफिक तांबोळी, पत्रकार जनोदिन तांबोळी, पत्रकार अविनाश बोधले यावेळी यांनी रितशिर काम केले. आणि यावेळी केशव मुरूमकर, उद्धव पवार, सुनील चिकणे, गणेश पवार, शरद पवार, पप्पू निकम, माणिक जाधव, अनिल कारंडे, सिताराम पवार, अशोक बिरंगळ, नागेश बिरंगळ, बलभीमकर सर, श्रिराम शेरे, पत्रकार अमृत कारंडे, कालिदास पवार, सुरेश कारंडे, बंडू निकम, दिपक पवार, राजू रंधवे, शत्रुघ्न जगताप, बाबुशा मंडलिक, शहाजी कवादे, सुनील पवार, विशाल मंडलिक यावेळी अनेक ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली..