कैलास शेंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरद
बोरद:येथील ग्रामपंचायतची ग्रामसभा सरपंच अनिता भिलाव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणा संपन्न झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी बोरद ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सकाळी ठीक १०.०० वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.ही सभा सरपंच अनिता भिलाव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेमध्ये ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी विविध विषय या वेळी मांडले.तसेच त्या विषयांवर चर्चा करण्यात आली. दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी अचानक आलेल्या वादळी पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत निर्माण झाले होते त्याचबरोबर वतावरणामध्ये विलक्षण गारठा निर्माण झाला होता.असे असतांना लागलीच दुसऱ्या दिवशी ही सभा घेण्यात आली.संपूर्ण ढगाळ वातावरण व धुक्याची चादर पसरल्यामुळे सभेच्या ठिकाणी संपूर्ण अंधार होता. अशी परिस्थिती असताना सुद्धा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेत एकूण पंधरा विषय या ठिकाणी मांडण्यात आले त्या पंधरा विषयांना खेळीमेळीच्या वातावरणात लागलीच मंजुरी ही देण्यात आली त्यामध्ये मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे त्याचबरोबर मागल्या तिमाही महिन्यात झालेल्या जमाखर्चास मंजुरी देणे, जन्ममृत्यू उपजत विवाह नोंदीचा आढावा घेणे, आलेली परिपत्रके व अर्ज वाचून चर्चा करणे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे विषय म्हणजे सन २०२४,२५च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, तसेच संविधान भवन बांधकामाच्या जागे संदर्भात चर्चा करणे व ठराव करणे, सांडपाणी, घनचकरा व्यवस्थापनाची कामे मंजुरी मिळाल्यानंतर पूर्ण करणे, विविध योजनांच्या विकास कामांना व प्रस्तावांना मंजुरी देणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०२४,२५ साठी समृद्ध बजेट मंजुरी देणेबाबत विषय मांडण्यात आला. शासनाच्या सर्व घरकुल योजना अपूर्ण घरकुल लाभार्थ्यांचे मार्गदर्शन करून पूर्ण करणे त्याचबरोबर मोदी आवास योजना अंतर्गत लाभार्थी निवड करणे तसेच ग्रामपंचायत कर वसुली करणेबाबत चर्चा करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांंबाबत ही यावेळी चर्चा करण्यात आली. सन २०२४,२५ वर्षाचा कृती आराखडा मंजुरी देणे व आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे अशा विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली आणि वरील विषयांना मंजुरी देण्यात आली.शेवटी आभार विजय पाटील यांनी मानले व सभेची सांगता करण्यात आली.यावेळी सरपंच अनिता भिलाव उपसरपंच नीलिमा जाधव,पंचायत समिती उपसभापती विजसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य गायत्री भिलाव, लताबाई पवार,निलुबाई ठाकरे, ज्योतीबाई साळवे,विठ्ठल ढोडरे,साजन शेवाळे,जुल्फेकार तेली,रवींद्र भिलाव, दिपक जाधव, बबलू राजपूत, संजय भिलाव, मंगलसिंग राजपूत, होण्या ठाकरे, रवींद्र ठाकरे उपस्थित होते.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.






