कैलास शेंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरद
बोरद:शासनाकडून आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी नाशिक येथील महाकवी कालिदास मंदिरात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते मोरवड येथील गुलाम महाराज यांचे वंशज जितेंद्र पाडवी यांना सन २०२२-२३ चा आदिवासी सेवक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्यामुळे सम्पूर्ण आदिवासी मध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनामार्फत दरवर्षी आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी सेवक पुरस्कार दिला जातो या वर्षाच्या २०२२-२०२३ चा आदिवासी सेवक पुरस्कार तळोदा तालुक्यातील मोरवड (रंजनपुर) येथील ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे गुलाम महाराज यांचे वंशज यांना आज रोजी आदिवासी विकास विभागामार्फत डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते तसेच आयुक्त नाशिक विभाग तुषार माळी, उपायुक्त नयना मुंडे,सचिव विनय वाघमारे यांच्या उपस्थितीत आदिवासी सेवक पुरस्कार व प्रशस्सीपत्र आणि पंचवीस हजार रुपये रोख देण्यात आले. आदिवासी समाजामध्ये विविध जनजागृती तसेच सेवा करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. जितेंद्र पाडवी हे गुलाम महाराज यांचे वंशज आहेत १९४३ पासून गुलाम महाराज रामदास महाराज तसेच चंद्रसेन महाराज यांनी आदिवासी समाजासाठी अहोरात्र कार्य केले आहे. जितेंद्र पाडवी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करीत असतात. वर्षातून शिवरात्री, सप्तमी, दीपावली व आषाढी एकादशी आशा चार वेळा रंजनपुर येथे आरती पूजन होत असते या आरती पूजनाला महाराष्ट्र,गुजरात, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यातून लाखो भाविक येत असतात त्या सर्व आदिवासी बांधवांना व्यसनमुक्तीचा संदेश या ठिकाणी देण्यात येत असतो. त्याचबरोबर स्वच्छता,शिक्षण बाबत आदिवासी समाजामध्ये आप की जय परिवारा मार्फत जागृती करीत असतात. समाजाला संघटित करण्याचे काम ते करीत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार दिला आहे. असे मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितले.यावेळी जितेंद्र पाडवी यांच्या पत्नी काशीबाई पाडवी भाऊ प्रेम पाडवी, मुलगा प्रवेश पाडावी सरपंच वासू पाडवी,माजी सरपंच प्रवीण वळवी कृष्णा पाडवी,मोरवड येथील उपसरपंच रंजीत चौधरी, संजय पाडवी सह असंख्य कार्यकर्ते त्याठिकाणी हजर होते.प्रतिक्रिया सन २०२२-२३ साठी आदीवासी सेवक पुरस्कार मला नाशिक येथे प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल मला खूप आनंद होत आहे. हा पुरस्कार नसून संपूर्ण माझ्या प्रत्येक समाज बांधवांचे तसेच आप की जय परिवाराचे प्रेम आहे. ह्या परिवाराने दिलेले प्रेम आपुलकी आणि माझ्या पूर्वजांची पुण्याई यामुळेच हा पुरस्कार मला मिळू शकला आहे त्यामुळे हा पुरस्कार माझा नसून सर्व आप की जय परिवार तसेच समाज बांधवांचा आहे.जितेंद्र पाडवी
मोरवड(रंजनपूर) ता.तळोदा.