मारोती बारसागडे
तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी, चामोर्शीतील सुप्रसिद्ध असलेल्या सारदा हिरो शोरूम व त्याच्याच बाजुला लागून असलेले वशिम अली सैय्यद याच्या घरामध्ये लोहखनिज वाहतूक करणारां ट्रक CG 08 AW 2329 घुसले. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी किंव्हा जखमी झाले नाही.
प्राप्त माहितीनुसार हा अपघात बुधवारच्या रात्र १.३० च्या सुमारास आष्टी टी पॉईंट इथून 100 मीटर अंतरावर असलेले आष्टी रोडला शारदा हिरो शोरूम आहे. याबाबत चामोर्शी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांना विचारले असता .
CG 08 AW 2329 क्रमांकाचा सुरजागड लोहखनिज वाहतुकी करिता मुलमार्गा वरून चामोर्शीतील आष्टी टी पॉईंट वळणावरून सुरजागडला जात असतांना लोहखनिज ट्रक भरधाव वेगाने असल्यामुळे चालक नामे आशिफ खान यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि सिधा शारदा हिरो शोरूम च्या लोखंडी अँगल, लोखंडी शिड्या आणि वशिम अली सैय्यद यांच्या घराची भित तोडून /फोडून अंदर घुसले.मात्र या अपघातात सुदैवाने कुणतीही जीवित हानी किंवा इजा झाले नाही. मात्र शारदा हिरो शोरूम ची आणी वशिम अली सैय्यद यांची खूप मोठी नुकसान झाली आहे.नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुशांत बेपरी आणि वशिम अली सैय्यद यांनी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजयानंद पाटील यांनी आपल्याच चमूसह घटनास्थळी पाहणी करून ट्रक ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला.अशी माहिती चामोर्शीचे निरीक्षक विजयानंद पाटील यांनी दिली.
आतापर्यंत लोहखनिज वाहतूक करणारे ट्रक मनुष्याना तर उडवत होतेच, आता शोरुम/ घर सुद्धा उडवायाला लागले.
तर गडचिरोली जिल्ह्यातील जनता या भीतीमुळे जगायचे तरी कसे असा प्रश्न जनतेच्या चर्चेत आहे.