मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे: येथील महादेव घाट परीसरातील अत्यंत गरीब कुटूंबातील मारोतराव कापसे यांचे घराला शाट सर्कीटमुळे आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे जिवीतहानी टळली असली तरी घरातील अन्नधान्यासह भांडीकुंडी व जीवनावश्यक वस्तु जळून नष्ट झाल्या आहेत. महादेव घाट परिसरामध्ये नदीलगत दाट लोकवस्ती असून अनेक बाहेर गावचे बेघर लोक येथे स्थायिक झाले आहेत. अशाच एका घरात कुटूंबासह राहणार्या मारोतराव कापसे यांचे घराला आग लागली. स्थानिक शेजारी यांनी मदत करत आग आटोक्यात आणली. तरीही घरातील जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य,भांडीकुंडी जळून नष्ट झाल्याने जगावे कसे? हा प्रश्न मारोतराव कापसे व त्यांच्या परिवारास पडला आहे.