गजानन वानोळे
ग्रामीण प्रतिनिधी किनवट
किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे गेल्या 25 ऑक्टोंबर पासून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून इस्लापूर येथे साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून या साखळी उपोषणात सहभागी होऊन कोसमेट येथील परमेश्वर देवराव सोंडकर राहणार कोसमेट तालुका किनवट यांनी आरक्षण मिळेपर्यंत आमरण उपोषण करण्याचे ठरविले आहे त्यामुळे त्यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने जंगी स्वागत करून त्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
परमेश्वर देवराव सोंडकर हा गरीब अतिशय मेहनती व्यक्ती आहे स्वतःच्या लेकरांना शिक्षण देताना अनेक अडचणी आल्यामुळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वतः आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचे इस्लापूर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्याच ठिकाणी परमेश्वर देवराव सोंडकर यांना सुद्धा पुष्पहार व फेटा बांधून सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर साखळी उपोषणात सामील होऊन परमेश्वर देवराव सोंडकर हे आज 30 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषणस बसले आहेत. इस्लापूर येथील मुख्य रस्त्यावर चुलीत गेले पक्ष चुलीत गेले नेते आरक्षण हे आमचे एकमेव लक्ष असे नामफलक लावण्यात आले . व नेते पुढारी यांना गावबंदी करण्यात आली.