संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी, इंदापूर
शेतकऱ्यांवरती दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना ऑक्टोंबर महिना ओलांडून देखील दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांनी आस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देवून पोटच्या पोरा प्रमाणे संभाळ केलेला ऊस महावितरण च्या शॉर्ट सर्किट मुळे ११ के व्ही च्या जास्त दाबाची विद्युत पुरवठा वाहिनीची तार तुटून पिलेवाडी फिडर (मिसाळी भरणे डी पी)येथील गोसावीवाडी गट नंबर १९५ संगीता तानाजी भरणे कृष्णात बाबु सांगळे गट नंबर १८० राघू बाबु सांगळे लीलावती बाबू सांगळे अर्चना शरद गावडे सविता सुनील खारतोडे विमल नानासो खारतोडे या सर्व शेतकऱ्यांचे अंदाजे दहा एकर ऊस जळून खाक झाले असून यावेळी त्या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु वाऱ्याचा वेग व उष्णतेच्या तीव्रते मुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अडथळे आले.यावेळी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी प्रतिक्रिया शेतकरयांनी व्यक्त केली.तसेच घटनास्थळी कळस गावचे तलाठी हगारे भाऊसाहेब व पिलेवाडी फिडर चे लाईनमन रवि देशमुख यांनी भेट दिली.(यावेळी आमचे इंदापूर प्रतिनिधी संतोष भरणे यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रेय (मामा)भरणे यांना संपर्क साधला असता त्यांनी महावितरण चे अधिकारी यांना फोन संपर्क करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले)