मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
अकोला अर्बन को.ऑ. बँक हिवरखेड शाखा समितीचे माजी अध्यक्ष तसेच विठ्ठल मंदिर संस्थान चे अध्यक्ष दानशूर स्व. किशोर महाराज बोहरा यांचे तीन महिने आधी निधन झाले.
बोहरा यांची हिवरखेड शहरातील शैक्षणिक संस्था,मंदिर तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये फार मोठी मदत असायची. पुत्र आनंद व दिपक बोहरा परिवाराकडून स्व. किशोर महाराज बोहरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विठ्ठल मंदिर संस्थानला गीता,रामायण, श्रीमद्भागवत कथा, भागवत प्रेम, गजानन पारायण, व्रत पर्वउत्सव, श्री गणेश पारायण, बृहस्पतिवार व्रत कथा, हनुमान चालीसा, दुर्गा चालीसा, कल्याण मासिक इतर 300 च्या वर ग्रंथांचे पुस्तके व पोथी इत्यादीची विठ्ठल मंदिर संस्थानला भेट दिले.यावेळी विठ्ठल मंदिर संस्थानचे सचिव सत्यदेव गि-हे,शंकरराव देशमुख, तायडे महाराज, ह.भ.प. विठ्ठल महाराज तेल्हारकर,नागपुरी गुरुजी
,मनोहर भालतिलक, प्रकाश बोंबटकार यांनी ग्रंथ दान दिल्याबद्दल आनंद व दीपक बोहरा यांचा विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने एकादशीच्या पूर्वसंध्येला शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठ्ठल मंदिर संस्थान च्या मंगल कार्यालयात तुकाराम गाथा पारायण शासनाचे नियमाला अनुसरून मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत हरिभक्त परायण ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या व्यासपीठ नेतृत्वात पारायण चे आयोजन करण्यात आले. दर्शनाला आलेल्या भक्तांना संस्थांकडून फराळ वाटप सेवाधारी यांच्या मदतीने करण्यात आले.










