अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
सिद्धार्थ विहार माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पास्टूल येथे २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबरला वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.जऺगलामधील वन्यजीव नामशेष होत आहेत.वनजीवाचे संरक्षण व संवर्धन करणे लोकांमध्ये जनजागृती करणे हाच या वनजीव सप्ताहाचा उद्देश आहे. वन्यजीव सप्ताह मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, त्यात निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा, फेस मास्क स्पर्धा घेण्यात आल्या. ७ ऑक्टोबरला माळराजुरा पर्यटन क्षेत्र येथे शैक्षणिक सहल काढण्यात आली.9 ऑक्टोबरला समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वानखडे होते त्यांनी विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन भरभरून कौतुक केले. प्रा. संगीता तेलगोटे यांनी वन्यजीव सप्ताह का साजरा करावा यावर प्रकाश टाकला. प्रा. प्रवीण इंगळे, प्रा. किर्ती किरतकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल कार्यक्रमास प्रा. छाया राठोड , प्रा. मंगेश इंगळे, प्रा. विनय खंडारे, प्रा. योगेश मेहरे, प्रा. सनी इंगळे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. सूत्रसंचालन कु.अंजली खंडारे व आभार प्रदर्शन कु.अंजली केकन यांनी केले.