मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे : तालुक्यातीलआदिवासी माना समाज ने उपविभागीयकार्यालयावर मोर्चा काढून काँग्रेसचे माजी न्याय मंत्री शिवाजी मोघे यांचा निषेध व्यक्त केला काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री शिवाजी मोघे यांनी नागपूर येथे झालेल्या सभेत माना समाज बोगस असून येणार्या काळात काँग्रेस सरकार सत्तेवर आली तर आम्ही यांना आदिवासी यादीतून वगळू असे वक्तव्य केल्यावरून आज हजारो माना समाज बाधवानी उपविभागीय कार्यालयांवर निषेध मोर्चा काढून निवेदन दिल. नागपुरसुरेशभट सभागृहात १८ सप्टेंबर आयोजित आदिवासी क्षेत्र बधन मुक्ती दिन समारंभात माना जमातीबद्दल अपेक्षा व्यक्त करणारे काँग्रेस नेते माजी न्याय मंत्री यांनी आदिवासी माना समाज बोगस असून येणाऱ्या निवडणूकीत काँग्रेस सत्तेवर आली तर माना जमातीला आदिवासी यादीतून वगळण्यात असल्याचे वक्तव्य जाहीर सभेत केले होते.या वक्तव्यावर महाराष्ट्रातील माना समाज आदीवासी समाज पेटून उठला असुन बुधवार रोजी या समाजाने अग्रवाल धर्मशाळे पासुन तर उपविभागीय कार्यकाल पर्यंत मोघे याचा निषेध करत मोर्चा काढून निवेदन दिले त्यात यांनी शिवाजी मोघे यांनी माना समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत आम्ही काँग्रेस पक्षाला जागा दाखवू असे म्हटले यावेळी विजय दांडेकर,गजानन चौके,शंकर रणदळे,शंकर नांदनवरे, सुनिल जीवतोड,महादेव नागासे,ज्ञानेश्वर डोंगर,हरीचंद्र दांडेकर,संजय गुडघे,मधूकर बगडे,दामोदर चौधरी, गुणवंत जांभुरे सह असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.माना ही स्वतंत्र आदिवासी जमात असल्याच्या निर्णय दिल्या नंतर महाराष्ट्र शासनाने सुद्धा माना जातीला जात वैधता प्रमाणपत्र व सोबत आदिवासीच्या सर्व सोई सवलतीचेपरीपत्रकावरील वक्तव्यकेलेमानाआदिवासी जमातीचा अवमान करणारे संविधान व मा. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाचा माज करणारे उंच आहे. तसेच मोघेंच्या मतानुसार माना जमातीचे आदिवासी म्हणून कारण आहे समाजामध्ये व्देष पसरवण्याचा पर्यत्न मोधेनी केला आहे.