निलेश गोरे
ग्रामीण प्रतिनिधी सोनाळा
विदर्भातील संत्री त्यांच्या आंबट गोड चवीसाठी जगप्रसिद्ध आहेत. दरवर्षी परदेशात संत्र्यांना मोठी मागणी असते. ही संत्री नागपूर, अमरावती येथून संत्री म्हणून विकत घेणारेही अनेक जण आहेत. मात्र दिवसेंदिवस कमी होत चाललेली पाण्याची पातळी, वाढते तापमान, पर्यावरणातील बदल, नवनवीन रोग, त्यासाठी लागणारी महागडी रासायनिक कीटकनाशके आदींमुळे संत्र्याचे उत्पादन करणारा शेतकरी अनेक वर्षांपासून अडचणीत सापडला आहे. सततच्या संत्रा सडणे आणि नासधूसने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर विळखा घातला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे, मात्र आता संत्रा गळतीचे संकट संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर उभे ठाकले आहे. संग्रामपूर तालुक्यामध्ये संत्रा फळांचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र वातावरणातील बदलामुळे संत्र्याच्या झाडांना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून गेल्या तीन महिन्यांपासून संत्र्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून लाखो रुपये किमतीची संत्री जाण्याची शक्यता वर्तवली जात असून,अस्मानी संकटाबरोबरच संत्रा उत्पादक शेतकरी सुलतानी संकटातून गेला आहे.यासाठी शासनाने शेतकऱ्यासाठी दुष्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकरी गट अध्यक्ष रवी लव्हाळे करत आहेत.
पाच एकरात संञा पिकाला योग्य प्रकारे खत किटकनाशकाची फवारणी केली माञ सदोष वातावरणामुळे संञा गळती थांबली नाही : शेतकरी गट अध्यक्ष रवी लव्हाळे