कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनधी बुलढाणा
बुलढाणा : पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी आयोजित केलेल्या सभेला येण्याचे निमंत्रण जिल्हाधिकारी यांनी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना काल दिल्याने आज ते जळगाव जामोद एसडीओ कार्यालय समोर ते हजर झाले असता त्यांना पोलिसांनी अटक केली . तर ही माहिती समजतात महिलांसह स्वाभिमानीचे शेकडो कार्यकर्त्यांनी पोस्ट समोर जमा होऊन घोषणा देऊन डिक्कर यांच्या आंदोलनाचे उघडपणे समर्थन केले .पूरग्रस्त व खरडून गेलेल्या जमीन साठी नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी त्यांनी २८ सप्टे. पासून एसडीओ कार्यालयासमोर अन्न त्या ग आंदोलन सुरू केले होते . त्यांना सर्व पक्षांचा वाढता पाठिंबा पाहून डिक्कर यांच्या राजकीय विरोधकांनी अन्नदान आंदोलनात काटे टाकणे सुरू केले .त्यांच्या उपोषण मंडपाचा विद्युत पुरवठा तोडला.शासनाने आंदोलन बेदखल केल्याचा संताप म्हणून त्यांनी लोकशाही मार्गाचा अवलंब करत डिक्कर हे चार दिवसापूर्वी भूमिगत झाले . व आत्मदहनाचा इशारा सरकारला दिला .काल दिनांक ३ सप्टेंबर रोजी स्वाभिमानीचे नेते मा.राजु शेट्टी यांनी सोशल मीडियावर बोलताना आत्मदहनानंतरच जर पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असेल तर आमचे प्रशांत डिक्कर आत्मदहन करणारच असा सज्ज इशारा राज्य सरकारला दिला होता .दरम्यान काल रात्री जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी प्रशांत डिक्कर यांच्या नावानिशी पत्र जारी करून त्यांना ८ सप्टेंबरच्या मिटींगचे आमंत्रणही दिले आहे . पूरग्रस्तांच्या समस्येसाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीची ही बैठक बोलावली आहे .तर आज जळगाव जामोद पोलिसांनी त्यांना अटक केली आहे , तर दोन्ही बाजूने जळगाव जामोद कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरू होता . प्रशांत डिक्कर यांच्या वतीने ॲड वीरेंद्र झाडोकार ,ॲड रुपेश विश्वेकर,ॲड मोहसीन खान हे त्यांच्या सुटके साठी त्यांची शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाजू मांडली, पोलिसांनी त्यांना न्यायालयात न्यायालयीन कोठडी मागितली त्यामुळे ८ सप्टेंबर च्या बैठकीला ते कसे जाऊ शकतील व जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्तांची बाजू त्या बैठकीत शासनासमोर मांडणार कोण हा मोठा प्रश्न पूरग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा होणार होता.जळगाव जा. पोलीसांनी डिक्कर यांचे साठी १७ सप्टेंबर पर्यंत पोलीस व न्यायालयीन कोठडी मागीतली होती पण त्यांच्या वकिलांचा मुद्देसुद युक्ती वाद ग्राहय धरून व एक जनाधार असलेला शेतकरी नेता म्हणुन न्यायालयाने डिक्कर यांचेवर कृपादृष्टी केली व त्यांची जमानतवर सुटका केली.आता ८ सप्टेंबला प्रशांत डिक्कर यांच्या जिल्हाधिकारी यांनी आयोजीत केलेल्या बैठकीत पुरग्रस्तांसाठी काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.