डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी,परभणी
सेलू : दि.9 ऑगस्ट 2023 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2023 .तालुका स्तरीय विज्ञान मेळावाचे आयोजन नूतन विद्यालयांमध्ये झाले होते.या मेळाव्यात तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता .सदरील मेळाव्यात न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल ची कु .सृष्टी अशोक करवा हिने प्रथम क्रमांक पटकावला.तिची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.तिच्या या यशाबद्दल यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष मुकेश राव हरिभाऊकाका बोराडे,सेलू शहराचे माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराड़े, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक साईराज मुकेशराव बोराडे, शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद तसेच विज्ञान शिक्षीका सौ. नावाडे मॅडम आदिनी अभिनंदन केले आहे.