कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा येथे जि.प.मराठी प्राथमिक कन्या शाळा येथे पूरग्रस्त व निराधार लोकांसाठी भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले.यावेळी खामगाव येथील डॉ.पियुषजी पुरोहित,ओम कठाळकर , डॉ.निलेश घनोकर व डॉ.अनुप हागे यांनी शिबिरात अमूल्य वेळ देऊन सेवा दिली. या शिबिरात सोनाळा२८५,पिंगळी १५, शेंबा २५,सालवन २८,गुमटी ८,सायखेड १५ एवढ्या रुग्णांनी सहभाग घेतला. शिबीर यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.