भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव:आज दि ०७ रोजी मौजे खरडगाव येथील भिल्ल कोळी शेड्युल ट्राईप एस टी समाजातील लोकांचे घरकुल मंजूर असूनही त्यांना जागेअभावी घरकुल बांधता येत नसल्याने ग्रामपंचायत कडून त्यांना राहण्यासाठी जागा मिळून घरकुल बांधण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड डॉ शिवाजीराव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली खरडगाव येथील भिल्ल व कोळी समाजातील ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम यांना शेवगाव येथे दिले निवेदनात म्हंटले आहे की,मौजे खरडगाव येथे भिल्ल व कोळी समाजाची १० ते १५ कुटुंब गेल्या २५-३० वर्षांपासून वास्तव्यास आहेत.आजमितीला ही कुटुंब खरडगाव येथील वनीकरणातील अंदाजे गट नंबर ५५० मध्ये राहत आहेत.या कुटुंबांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही.त्यामुळे पर्यायाने झोपडी व छप्पर बांधून हे राहत आहेत.पक्के घर नसल्याने पावसाळ्यात येथील नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. परिणामी मुलांच्या शिक्षणाकडेही दुर्लक्ष होत आहे.दोन वर्षांपूर्वी तत्कालीन गटविकास अधिकारी यांना देखील येथील कुटुंबांनी संपर्क साधला होता.ग्रामसेवकांना देखील कल्पना दिली असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.येथील दादासाहेब सुखदेव दळे, मच्छिंद्र बापू साबळे,अमोल ताराचंद साबळे,शोभा दिपक पन्हाळे यांना घरकुल मंजूर मंजूर होऊनही स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने घरकुल बांधता आले नाही.त्यामुळे येथील एस टी जमातीच्या लोकांना शासनाच्या योजनेअंतर्गत स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून देऊन तेथे घरकुल बांधण्यास परवानगी द्यावी असेही निवेदनात म्हंटले आहे.निवेदन देतेवेळी अंकुश तेलोरे,भाऊसाहेब राजळे,बबनराव गडाख, सुनील चित्ते,छबु निकम,सौ शोभा पन्हाळे,पुष्पा माळी,मनिषा दळे, कल्पना साबळे,शितल सोनवणे,मालनबाई साबळे,शांताबाई सोनवणे,कल्पना सोनवणे,नंदा साबळे,जिजा माळी,शोभा निकम,सुनिता दळे,मालन बर्डे,दुर्गा साबळे,आशाबाई चित्ते,ताराबाई बोबडे आदि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.











