सुनिल गेडाम
तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
लाडबोरी: गावाच्या विकासासाठी ग्राम पंचायत मध्ये गावातील नागरिक ग्राम पंचायत मध्ये आपल्या मताच्या अधिकाराने प्रतिनिधी पाठवित असतो,पण हाच लोकप्रतिनिधी सत्तेवर बसल्यानंतर गावातील नागरिकासाठी विकास काम करण्याचे विसरून जातो ही शोकांतिका आहे,सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने गावात पूर्णतः अस्वच्छता पसरली आहे,त्याच एक उदाराहणं म्हणजे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणारे वेठबिगार मजूर हे लोक नाल्या, खात,या वरून पडीक ठिकाणावरून दारू च्या बाटल्या प्लास्टिक अश्या वस्तू उचलून एक प्रकारे अनपेक्षित पणे स्वच्छता दुताच काम करतात, हे स्वच्छता दूत लाडबोरी या गावी येऊन त्यांनी गावातील बुजलेल्या नाल्या मधून दारूच्या बाटल्या प्लास्टिक बाटल्या पॅनी उचलून ग्राम पंचायत ला जे स्वच्छता करणे जमले नाही ते करून दाखवले आहे,फक्त आपल्या पोटाची खळगी भरण्याकरिता वेठ बिगारी करीत गावातील कचरा या स्वच्छता दुतांनी उचलला आहे,तब्बल तीन मोठ्या पिशव्या कचरा गावातून उचलला आहे आणी ग्राम पंचायत च्या सत्ताधाऱ्यावर स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे,शासन गावातील स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे,पण सत्तेवर बसलेल्या पदाधिकाऱ्यांना गावातील स्वच्छतेबाबत काहीच घेणं देण नाही ही संपूर्ण खरी वास्तविकता आहे,गावातील घाणीने रोगराई पसरून मेले काय आणी जगले काय फक्त सत्तेवर बसून मिळणारा मालिंदा खायचा का? हा प्रश्न निर्माण होतो.









