फैयाज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
ओतूर(प्रतिनिधी) नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गवर ओतूर येथील कोळमाथा येथे रविवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास पिकप आणि मोटार सायकलचा अपघात झाला या अपघातात मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला आहे.
अधिक माहिती अशी की पिकअप एम.एच १४ जी यु ८७७३ आळेफाटाच्या दिशेने कल्याणकडे जात असताना आणि मोटार सायकलस्वार ओतूरवरून घरी जात असताना कोळमाथा येथे अपघात झाला असून अपघातात मोटर सायकलस्वार दिनेश नारायण भले (वय ३२) रा. तेलदरा (ओतूर) त्ता.जुन्नर जि.पुणे जागीच ठार झाला आहे असे ओतूर पोलिसांनी सागितले.


