भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
माहुर तालुक्यातील नदी नाला काठावरील मौजे हरडप येथील पुरग्रस्त ३५, नागरिकांना श्री रेणुकादेवी संस्थान कडुन माहुर चे कर्तव्य दक्ष काळजी वाहु तहसीलदार यांच्या हस्ते मौजे हरडप येथील ३५, नागरिकांना साडी चोळी अन्न धान्य किट चे वाटप केले माहुर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी लोकांना गाव सोडावे लागले काही गावात नदीचे पाणी घरात शिरल्याने त्यांना उदरनिर्वाहासाठी अन्न धान्य उरले नाही अशातच हरडप येथील ३५, नागरिकांना अन्न धान्य किट चे वाटप करुन अनमोल असे उत्कृष्ट सहकार्य श्री रेणुकादेवी संस्थाने पुरग्रस्त वासीयांना केले आहे या वेळी अव्वल कारकून केशव झुंंबटकर, तलाठी धनाजी हेंडगे, सरपंच दिपक किनाके, सभापती शिवसेना तालुका प्रमुख उमेश जाधव, डॉ पंकज टनमने, अविनाश टनमने, अरविंद पवार, काशिनाथ ठमके,पवन पाटील, गणेश राठोड, यांच्या सह नागरिक उपस्थित होते.