नूतन सोशल फाऊंडेशनचा उपक्रम
अविनाश पोहरे / चिफ ब्युरो, अकोला
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय अकोला येथे आज सोमवार दि.12 जुलै 2021 रोजी रात्री दहा वाजता नुतन सोशल फाऊंडेशन च्या वतीने भव्य भोजनदानाचा कार्यक्रम आयोजीत केला गेला होता.नुतन सोशल फाऊंडेशनचे सदस्य आयु.योगेश शेगांवकर यांना पुत्रप्राप्ती झाली.ह्या प्रसंगाच्या निमित्ताने आपल्या कडुन रुग्णांची व त्यांच्या गरजु नातेवाईकांची सेवा व्हावी त्यांना मदत व्हावी ह्या ऊद्देशाने हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.अशी माहीती आयोजक तथा नुतन सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष,युवा सामाजिक कार्यकर्ते संघदिप शेगांवकर यांनी दिली आहे.
या उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते गौतम शेगांवकर,अमर भस्मे, साहील दाभोडे व फाऊंडेशनच्या संपुर्ण टिमने अथक परीश्रम घेतले.ह्यावेळी डॉ.मयुर वाकोडे सर,डॉ.नेताम सर,तरुण सेक्युरीटी स्टाफ सौ.ज्योती वानखडे,सुनंदा पातोंड, सीमा कांबळे, पुनम वानखडे व इतर कार्यकर्ते ऊपस्थीत होते.