अभिजीत फंडाट
ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
अकोला : तालुक्यातील कंचनपूर ,हातरून आणि लोणाग्रा ,बदलापूर जवळ पावसाच्या एकाच पाण्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याकडे सार्वजनिक विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. हातरून, बदलापूर या गावातील नागरिकांना अकोला येण्यासाठी एकच रस्ता असून इतर कुठलाही मार्ग नाही दरम्यान या रस्त्याने जड वाहतूक गेल्यामुळे या रस्त्याचे नुकसान झाले आहे. सदरचा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिनस्त येतो रस्ता दुरुस्त करावा यासाठी आजू बाजूच्या ग्रामपंचायत नि वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या तरी याच्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव चित्र ह्या रस्त्यावरील खड्यात साचलेल्या पाण्यावरून दिसत आहे. अकोला येण्यासाठी नागरिकांना एकच मार्ग असल्यामुळे त्याचे हाल होत आहे ,पायदळ सुद्धा रस्त्याने जाता येत नाही सार्वजनिक बांधकाम आणि याच्याकडे लक्ष द्यावे पाणी करून त्याच्यावर उपाय योजना करावे अशी मागणी शिवशंकर पाटील उपसरपंच कंचनपुर तथा सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा प्रसिद्धीप्रमुख यांनी केली आहे