भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव: कर्मयोगी जगन्नाथ कान्होजी उर्फ आबासाहेब काकडे यांच्या 104 व्या जयंती माह निमित्त आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय,शेवगाव येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह,शेवगावचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा लक्ष्मणराव बिटाळ यांनी भूषविले.प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्या सौ हर्षदाताई काकडे,पृथ्वीसिंगभैय्या काकडे,पहिली महिला महाराष्ट्र केसरी पै भाग्यश्री हनुमंत फंड, उपप्राचार्य,श्रीम रूपा खेडकर,मेजर हनुमंत फंड,कुस्ती पंच शुभम जाधव,भाग्यश्रीचे प्रशिक्षक प्रतीक जाधव,राष्ट्रीय खेळाडू साक्षी इंगळे, तसेच क्रीडा शिक्षक बारवकर सर,कुऱ्हाडे सर,गहिनीनाथ शिंदे,पठाण मेहमूद सर,अमोल जाधव,माळी सर,घोडके सर,मुख्याध्यापक अरुण वावरे,राम काटे,गणेश ढोले,विक्रम घुटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका श्रीम गरुड मॅडम यांनी केले.यावेळी सौ हर्षदाताई काकडे यांनी सांगितले,की आबासाहेब हे उत्तम कुस्तीपटू होते.उत्तम कुस्तीपटूच्या जयंतीनिमित्त कुस्तीस्पर्धा उद्घाटनासाठी मुद्दामहून उत्कृष्ट महिला कुस्तीपटूला बोलावले आहे. तसेच त्यांनी कुस्तीपटूची निवड कशा पद्धतीने केली जाते.याची माहिती दिली.भाग्यश्री फंड हीने सांगितले, की फिटनेससाठी कुठलेही खेळ खेळू शकता.तुमचे शरीर तंदुरुस्त असेल तर तुम्ही रोगराईपासून दूर राहू शकता.मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रा लक्ष्मणराव बिटाळ यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले,की कुस्ती ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही,मुलीही कोठे मागे नाहीत.स्पर्धा सर्वांना प्रेरणा देणारी ठरावी.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रतिमा उकिर्डे यांनी केले.उपस्थितांचे आभार क्रीडा शिक्षक श्री. कल्पेश भागवत यांनी मानले.