सतिश गवई
तालुका प्रतिनिधी उरण
उरण : शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे आमदार विवेक पाटील यांनी पत्र काढून आपण सक्रिय राजकारणातून आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यतातून राजीनामा देत असल्याचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. विवेक पाटील हे रायगड जिल्ह्यातील गेल्या 40 वर्ष पासून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आणि नंतर चार वेळा आमदार,म्हणून लोकप्रतिनिधी मिळवलं होतं.अत्यंत हुशार राजकारणी प्रशासनावर पकड असलेला नेता आणि सर्वसामान्य मध्ये मिसळणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती. काही वर्षांपूर्वी एका जीव घेण्या आजारातून ते सावरले होते. मधल्या काळात ज्या कर्नाळा बँकेची त्यांनी निर्मिती केली त्यामध्ये गैरवहार झाल्याचे कारण पुढे आले काही कोटी रुपयांची अपराताफळ झाल्याचं समोर आलेला आहे. व त्याची जबाबदारी विवेक पाटील यांच्या वरती आली व त्यांनी घेतली त्याच गुन्ह्यामध्ये ते आज कारागृहामध्ये बंद आहेत. पुन्हा एकदा मागील आजारानं उठाव केला असून आपल्याला शरीर साथ देत नाही हे कारण पुढे करून एका पत्रकाद्वारे त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून व सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलेला आहे. परंतु पनवेल आणि उरण मध्ये अशीही चर्चा आहे की हा ईडी चा चमत्कार तर नाही… काही काल आपल्याला आता वाट पाहावी लागेल विवेक पाटील ज्या गुन्हा अंतर्गत जेरबंद आहेत ते सुटून बाहेर तर येत नाहीत काही गोष्टींची उत्तरे मिळण्यासाठी आपल्याला वाट पहावी लागेल.अशी पनवेल उरण मध्ये चर्चा सुरू आहे पत्रकारितेच्या भाषेमध्ये ही सूत्रांची माहिती आहे.


