सत्यपाल वाघमारे
तालुका प्रतिनिधी खेड
खेड : 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बा. मा. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिरदवडी चाकण मध्ये ओम शांती ब्रह्मकुमारी शाखा चाकण मधील दीदी व भैय्या यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना योग व मेडिटेशन चे मार्गदर्शन केले व कृती करून घेतली. विद्यालयाच्या वतीने प्रभारी मुख्याध्यापक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.