मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
आज 9 तारखेला आलेल्या पावसामुळे आनंदमय वातावरण .गेले अनेक दिवसापासून शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होते.तर काहि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कपाशी पीक असल्यामुळे बोरवेलच्या भरोशावर अवलंबून होते .कपाशी पेरलेल्या पिकाला पाणी देत होते. तरीसुद्धा कपाशी पिकाला पुरेसे पाणी मिळत नव्हते . येरे येरे पावसा अशी शेतकऱ्यांची गती होती.परिसरात मागील पंधरा ते वीस दिवसापासून पावसाने दांडी मारली होती परंतु आज नऊ तारखेला पावसाचा शुभारंभ झाला आहे. या आलेल्या पावसामुळे परिसरात आनंद आहे थोडाफार का असेना पाऊस आल्यामुळे. अनेक शेतकरी आज आनंद व्यक्त करीत आहेत तसेच काहि गावकरी मंडळी डफळे वाजून. तर काही बासुरी वाजून. पाण्याचा आस्वाद घेत आहेत रिमझिम पावसामुळे परिसरात सगळीकडे आनंदाचे वातावरण दिसत आहे आणखीन दोन-तीन दिवस असाच रिमझिम पाऊस पाहिजे. अशी आशा गावातील नागरिक व शेतकरीवर्ग करित आहे. येरे येरे पावसा चा अपडेट सफल झालेचे चित्र दिसत आहे.