अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव तालुक्यातील जंगलागलगतच्या शेतात वन्यप्राण्यांचा हैदोस असल्यामुळे शेतकरी पीक कसे वाचवावे या चिंतेत आहेत .तालुक्यात पांगरी नवघरे,डॉगरकिन्ही,मुंगळा,मेडशी,अमानवाडी,राजुरा किंहिराजा ,गांगलवाडी,सुदी,या परिसरात वन्य प्राण्याचा हैदोस सुरू आहे दहा ते पंधरा एकरातील सोयाबीन वन्य प्राण्यांनी फस्त गाव संपूर्ण जंगलांनी घेरलेले आहे त्यामुळे रोही,डुक्कर,हरीण इत्यादी वन्य प्राण्याचा मोठ्या प्रमाणात वावर सुरु आहे.पेरणी झाली तेव्हापासून पाण्याने दडी मारल्याने आधीच शेतकरी आस्मानी संकटाचा सामना करीत असतानाच वन्य प्राण्याने जवळपास परिसरातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करण्याचे काम सुरू आहे दहा ते पंधरा च्या जवळपास रोह्याचे कळपच्या कळप एकदा शेतात घुसले की त्या शेतातील एवढ्या कळपामध्ये एक एकर सोयाबीनखाण्याला दोन ते अडीच तीन घंटे मध्ये एकरातील सोयाबीन चे नायनाट करतात शेतकऱ्यांवर फार मोठे संकट आले. पेरणीसाठी अगोदरच उसने पैसे घेऊन पेरणी केली त्यात हे संकट आल्याने शेतकरी पुरा हतबल झाला.वन्य प्राण्याने सोयाबीन फस्त केलेल्या शेतकऱ्याच्या शेताचे पंचनामे करून त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी दर वेळेस शेतकरी करत असतात मात्र नुकसानभरपाईची मागणी करण्यापेक्षा रोही व रानडुक्कर यावंनप्राण्याचा कुठेतरी वनविभागाने बंदोबस्त करण्याची गरजआहे दर वर्षी परिसरात प्रचंड प्रमाणामध्ये वन्यप्राणी नुकसान करतात संबंधित वनाधिकारी पाहणी करून पंचनामा करतात पंचनामे करून शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळवून देतात मात्र तुटपुंजी मदत मिळवण्यापेक्षा कायमस्वरूपी रोही या प्राण्याचा बंदोबस्त करावा प्रशासनाच्या निदर्शनास आणून अभयारण्याला कुंपण किंवा मग इतर कुठला पर्याय निवडावा पाण्याच्या दिवसांमध्ये शेतात अनेक प्रकारचे प्राणी असतात ते मानवी जीवनाला घातक असतात अशा स्थितीत शेतातील पिकाचे रक्षण करण्याकरीता रात्रीच्यावेळेस गस्त घालावे लागते याची दखल घेऊन संबंधित विभागाने काही ठोस पावले उचलून त्या वन प्राण्याचा बंदोबस्त करावा जेणेकरून परिसरातील शेतकऱ्यांची या वन्य प्राण्या पासून सुटका होईल अशी मागणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने सध्या जोर धरत आहे.











