महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.९:- येथील नवीन बसस्थानका जवळील संयोग लाॅज च्या इमारतीची विक्री करताना जबरदस्तीने माझी स्वाक्षरी घेऊन माझी फसवणूक केली असल्याचा आरोप संयोग चौबे यांनी पत्रपरिषदेत केला. पत्रपरिषदेत संयोग चौबे यांनी सांगितले की, मौजा चिचोर्डी येथील भू.मा.क्र.१०६ मधील भूखंड क्र.७ आराजी १८५ चौ.मी. हा स्व. काशीनाथ चौबे यांनी त्यांची पत्नी श्रीमती शांती काशीनाथ चौबे यांच्या नावाने विकत घेतला. माझे वडील काशीनाथ चौबे यांनी सदर भूखंडावर व्यवसाय व निवासाच्या दृष्टिकोनातून लाॅज व घर यांचे बांधकाम केले. तसेच त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी लाॅजींगचा व्यवसाय केला. त्यांच्या मृत्यूनंतर मी सदर व्यवसाय सुरु ठेवला व मी तेथेच वास्तव्यास होतो व आहे. सदर भूखंड व त्यावरील संपूर्ण बांधकाम केले असलेल्या मिळकतीचा ताबा, वहिवाट, कब्जा माझ्याकडेच आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आई शांती चौबे ह्या मागील सात-आठ वर्षापासून नागपूर येथे मुलीकडे राहात आहेत.दि.३० मार्च २०२१ रोजी मोहबाळा येथील खुल्या भूखंडाचे विसारपत्र करुन देतो म्हणून माझी फसगत करुन त्या विसारपत्रावर स्वाक्षरी घेतली.या भूखंडावर बांधलेल्या गाळ्यामध्ये तीन किरायेदार आहेत. सदर विसार झाल्यानंतर काही दिवसांनी आशिष तांडेकर यांनी मला लाॅज बंद करुन ताबा देण्यास सांगितले. तेव्हा स्वाक्षरी करुन दिलेल्या दस्तावेजाबाबत चौकशी केली असता आपली फसगत झाल्याचे प्रथमत: कळले. सदर भूखंड व भूखंडावरील बांधकाम केलेल्या माडीचा सौदा करण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यावेळी मला सदर व्यवहार करायचा नसल्याने वकिलामार्फत दि.१२ मे २०२१ रोजी वर्तमानपत्रात तशी जाहिरात दिली. त्यानंतर आशिष तांडेकर हे वारंवार मला त्रयस्त व्यक्तिला घेऊन येऊन जिवे मारण्याची धमकी देत आहेत. असाही आरोप संयोग चौबे यांनी पत्रपरिषदेत केला. त्यांच्या धमक्यांना न घाबरता मी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता तांडेकर यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मला दि.१४ जून २०२१ रोजी भद्रावती येथील न्यायालयात दाद मागण्याकरीता खटला दाखल करणे भाग पडले. सदर खटला न्यायप्रविष्ठ असताना आई शांती चौबे यांनी तांडेकर व बंधू यांना खटल्याची पूर्ण कल्पना व माहिती असताना दि.१७ जून २०२१ रोजी गैरकायदेशीर विक्री केली. सदर मिळकतीवर तांडेकर यांना कोणताही ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे तांडेकर व त्यांचे बंधू आता ताबा मिळविण्याकरीता पोलिस प्रशासनातील कर्मचा-यांना हाताशी धरुन धमकावित असल्याचा आरोपही
संयोग चौबे यांनी पत्रपरिषदेत केला.संयोग चुकीच्या लोकांना हाताशी धरुन गैरकायदेशीर काम करीत आहेशांती चौबे यांचा प्रत्यारोपसंयोग लाॅजच्या इमारत विक्री प्रकरणी संयोग चौबे यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करताना संयोग हा चुकीच्या लोकांना हाताशी धरुन गैरकायदेशीर कामे करीत आहे असा प्रत्यारोप संयोगच्या आई शांती चौबे यांनीही पत्रपरिषद घेऊन केला. आपल्यावरील आरोपांचे खंडन करताना शांती चौबै यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, भू.मा.क्र.१०६ मधील भूखंड क्र. ७, १४, १५ व २८ ची मी मालक होती. दि.३० मार्च २०२१ रोजी पंजीकृत नोंदणीकृत ताबा विसारपत्राने विकत घेणा-याचा सौदा केला व त्याच दिवशी मोक्यावर ताबा दिला. ताबा देताना मी शांती चौबे, माझा मुलगा संयोग, मुली व विकत घेणार मंगेश, भास्कर व आशिष हे तांडेकर बंधू उपस्थित होते. याचा फोटोही आमच्याकडे उपलब्ध आहे. दि.१७ जून २०२१ रोजी भूखंड क्र.७ चे विक्रीपत्र झाले. माझ्या नावाने माझ्या वडिलांनी सदर भूखंड विकत घेऊन दिले असल्याने ते माझे स्त्रीधन आहे. माझ्या हयातीत मालमत्तेत मुलांचा कोणताही अधिकार नाही. असे असताना विसारपत्र नोंद करताना दि.३० मार्च रोजी संयोग याने स्वत: साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली आहे. ही वास्तविकता असताना माझ्याकडून जास्त पैसे उखळण्याकरीता तो एकत्रीत कुटुंबाची मालमत्ता असल्याचे सांगत आहे.असा आरोपही शांती चौबे यांनी पत्रपरिषदेत केला. तसेच दि.५ जुलै रोजी सुनावनीकरीता दावा असताना दि.४ जुलै रोजी रात्री १२ वाजता नंतर आशिष तांडेकर व त्यांच्या मालकी हक्कातील भूखंड क्र.७ वरील मालमत्तेचा संयोग याने गैरकायदेशीर प्रवेश करुन कुलूप तोडून तेथील डी.व्ही.आर. चोरुन नेले. तसेच स्वत:चा ताबा आहे असे दाखविण्याकरीता ‘संयोग लाॅज’ असे फलक लावले. याबाबत तांडेकर यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संयोग विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केल्याचेही पत्रपरिषदेत सांगण्यात आले. संयोग हा दारुच्या व नशेच्या आहारी गेला असून त्या आधारावर तो जास्तीत जास्त पैशासाठी आई व बहिणींना मानसिक त्रास देतो. त्याला चुकीच्या लोकांची संगत असल्याने व तो मला नेहमी मारहाण करीत असल्यानेच मी नागपूरला मुलीकडे राहायला गेली. तो चांगल्या मार्गाला लागेपर्यंत त्याला एकही पैसा देणार नाही. मी मधुमेह व हृदय विकाराने आजारी असल्यामुळे मला माझ्या औषधोपचारासाठी पैशाची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर भूखंड विकावा लागल्याचेही शांती चौबे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.दरम्यान, आशिष तांडेकर यांनी आपण संयोग चौबे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाचा इंकार केला असून त्यांनी तसा पुरावा द्यावा असे आवाहन केले आहे. उलट संयोग यांनीच मला बंदुकीच्या गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रत्यारोप पत्रपरिषदेत केला. पत्रपरिषदेला शांती चौबे, आशिष तांडेकर, सरस्वती पांडे आणि राजलक्ष्मी पाठक उपस्थित होते.