राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी – राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा महाराष्ट्र च्या वतीने आरक्षण बचाओ, लोकतंत्र बचाओ आन्दोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याना देण्यात आले.या निवेदनात पदोन्नतीतील आरक्षण रोखण्याबाबत शासन निर्णय रद्द करणे, शिक्षण व नौकरी बाबत आरक्षण रद्द न करणे, ओ.बी.सी. जात निहाय जनगणना करणे, नोकर भरती त्वरित चालू करणे, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करणे, मराठा समाजाला आरक्षण लागू करणे, कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या लोकांच्या नातेवाईकाना आर्थीक मदत करणे, आदि मागण्या निवेदनात आहेत.हे निवेदन सम्पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी देण्यात आले. निवेदन देतेवेळी प्रा.अशोक वंजारी जिल्हाध्यक्ष, जनार्धन ताकसाण्डे महासचिव, प्रमोद बाम्बोळे उपाध्यक्ष पूर्व विदर्भ, पुण्डलिक शेंडे जिल्हा अध्यक्ष प्रोटोन, भोजराज कान्हेकर तालुका अध्यक्ष, नरेश बाम्बोळे,प्रमोद राउत, मनोज खोब्रागडे, कल्पना लाडे, यज्ञराज जनबंधू उपस्थित होते. या मागण्या पुर्ण न झाल्यास पुढे चरणबध्द आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला आहे.











