राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली – लाकडाऊन चा पार्श्वभूमीवर सर्व काही बंद असतांना अवैध्य धंधे मात्र सुरळीत सुरु असल्याचे चित्र दिसत आहेत. त्यात मुख्यत्त्वे करून दारू. मात्र प्रशाषन गप्प दिसतोय. याच नेमकं कारण काय तेच कळत नाही.
मागचा वर्षी कोरोनाचा पार्श्वभूमीवर, कोरोनाची साखळी तुटावी यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आले, त्यात लाकडाऊन हा त्याचा मुख्य भाग होता. याचाच फायदा घेत अनेक मोठं मोठे व्यापारी सुगंधित तंबाकू, दारू या व्यसायामध्ये हात अजमावून धन संग्रह करण्यात यशस्वी झालेत. याच मार्गावर बरेच जन किस्मत अजमावण्यात उशिरा झाल्याचा खंत ही व्यक्त केले. आता यावर्षी आपण उशीर करून चालणार नाही या हेतूने युवा वर्ग अवैध्य धंद्यात शिरल्याचे चित्र दिसत आहेत. आधीच बेरोजगारी मुळे त्रस्त, असलेले रोजगार कोरोनामुळे हिरावले असल्यामुळे युवावर्ग अवैध्य धंद्यात गुंतले असल्याची चर्चा आहे. एकतर अवैद्य दारू विक्रीला आळा घाला किंवा आम्हाला विकण्यास मुभा द्या असली मागणी युवा वर्गाकडून होत आहे. तेलंगणच्या सीमेवर नाकाबंदी असताना सुद्धा विक्रेते लाकडाऊन कालावधीत पोलीस बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा घेत अनेक प्रकारची शक्कल लढवून गावात आणून इंग्रजी दारू दुप्पट-तिप्पट रुपयात विकून मोठा रक्कम जमवीत असल्याची चर्चा आहे. यात शासण, प्रशासन कधी कोमातून बाहेर येथील, त्यांचाच आशीर्वादाने हे सर्व चालत असल्याची नागरिकात संभ्रम निर्माण होत आहे. काही असो पण यामुळे कोरोना वाढून मृतकांचा संख्येत वाढ होणार हे निश्चित.


