अनिल ठोकळ, जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
मेहकर : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे.त्याच्या निषेधार्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाटिका समोर मेहकर येथे कोरोना नियमाचे पालन करुण मर्यादित पदाधिकारी सह आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे यांच्या उपाध्यक्ष प्रल्हाद अन्ना लष्कर, भारतीय जनता पार्टीचे मेहकर तालुका अध्यक्ष अँड.शिव ठाकरे पाटील, भारतीय जनता पार्टीचे अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाअध्यक्ष सिताराम ठोकळ महाराज, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा संघटक किरण सुरेश जोशी, मेहकर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर, तालुका सरचिटणीस भाजपा रोशन काबरा, महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ.चित्रलेखाताई पुरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेश नवले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तीव्र निषेध केला.