अकोला : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अकोला याच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या कलांचा समावेश करण्यात असून पात्र व इच्छुक मंडळ किंवा स्पर्धाकांनी सहभागी होण्यासाठी दि. 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन शनिवार दि. 31 डिसेंबर रोजी भारत स्काऊट आणि गाईड कार्यालय येथील हॉलमध्ये करण्यात आले आहे. जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या दोन कलांचा समावेश राहणार असून लोकगीतासाठी साथसंगत देण्याऱ्यायासह जास्तीत जास्त दहा स्पर्धक व लोकनृत्य या स्पर्धामध्ये वीस स्पर्धक सहभागी होवू शकतात. स्पर्धत सहभागी होणारे स्पर्धक व साथसंगत देणाऱ्यांचे वयवर्ष 15 ते 29 वयोगटातील असावे. लोकनूत्य सादर करणाऱ्या संघाने पुर्वाध्वनीमुद्रित टेप अथवा रेकॉडिगला परवानगी दिली जाणार नाही. तसेच लोकगीत सादर करणाऱ्या संघाचे गीत व लोकनृत्य चित्रपट बाहय असावे. प्रथम क्रमांकाच्या संघाला विभाग स्तरावर निवड करण्यात येईल. जिल्हास्तर युवा महोत्सवाचे प्रवेश अर्ज सादर करतांना संस्थेने किंवा मंडळाने स्पर्धकांचे प्रवेश अर्ज विहित नमुन्यातील ओळखपत्र(इंग्रजी/मराठी), आधारकार्ड व जन्मतारीखेचा दाखला असणे आवश्यक आहे. ओळखपत्रावर स्पर्धकांची बाब स्पष्टपणे नमुद असावी. अधिक माहिती व नियमावली करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. स्पर्धत सहभागी होणाऱ्या संस्थेने किंवा मंडळाने आपले प्रवेश अर्ज विहित मुदतीत या कार्यालयात सादर करावे. विहित मुदतीनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व स्पर्धत सहभागी होता येणार नाही यांची नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.