अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
विवरा : येथील शेत मजुरी करणारे रामदास सिरसाठ यांची मुलगी दिपाली हिचा दुर्धर आजारावर अकोला येथे रूग्णालयात उपचार सुरू होता. तिच्या तब्येत मध्ये अजिबात काही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी मुबई येथे हिंदूजा हाॅस्पिटलला नेण्यास सांगीतले. तिथे तिच्या उपचारासाठी जवळपास 13 लाख रुपये खर्च येणार आहे असे तिथे सांगितल्याने दिपाली च्या परिवारा समोर मोठा प्रश्न उभा राहिला व तिचे कुटुंबीय खुप मोठ्या अडचणीत सापडले. कुटूंबियांनी दिपालीला तिला झालेल्या मोठ्या आजारातून बाहेर काढण्याची आशा आता सोडली होती गरीब परिस्थित एवढे पैसे आणायचे कुठून असा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा होता.अशात गावातील एकानी दिपालीच्या वडिलांना रूग्णसेवक मंगेश केनेकर यांच्या बद्दल माहिती दिली व त्यांना भेटण्यासाठी सांगितले.त्यानुसार महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे मंगेश केनेकर यांची दिपालीच्या कुटूंबियांनी भेट घेत त्यांच्याकडे मदतीसाठी विनंती केली.रूग्णसेवक मंगेश केनेकर यांनीही दिपालीला तिच्या उपचारासाठी लागणारी मदत मिळवून देण्याचं आश्वासन देत मुबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधी व इतर विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 13 लाखाचा निधी जमा करून दिला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष तसेच पातूर तालुका विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार बायस, सरचिटणीस रक्षण देशमुख, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटना पातुर तालुका अध्यक्ष किरण कुमार निमकंडे,स्वप्निल रेवाळे यांनी विशेष कामगिरी बजावत यांची विवरा येथील दिपालीच्या उपचारासाठी विशेष मदत झाली. दिपालीने तिला झालेल्या दुर्धर आजाराशी झुंज देत तिच्यावर मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल मध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टिमने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून दिपाली सिरसाटला नवीन जीवन देवून तिचा दिपक प्रकाशमान केला.आता तिच्या परिवाराला दिपालीला जगवण्याची आशा उंचावली आहे,अशी एक दिपाली नव्हे तर अनेक रुग्णांची सेवा हीच सर्व परी समजून महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेने अनेक रुग्णांना जीवन जगण्याचे बळ मिळवून दिले आहे.महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत दिड हजार रूग्णांना काही कोटी रूपयांची मदत मिळवून देण्यात आली आहे. दिनदुबळ्या निराधार रूग्णांना कायम मदत मिळवून देण्यासाठी तत्पर असणारे विवरा येथील महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे सरचिटणीस रूग्णसेवक मंगेश केनेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.