नांदेड : नांदेड शहरात दोन घटनांत सोमवारी दोन तरुणांचा खून झाला. स्वप्निल नागेश्वर (३०) व शेख मोईन शेख इक्बाल (२२) अशी मृतांची नावे आहेत. वसंतनगर येथील रहिवासी स्वप्निल शेषराव नागेश्वर यास २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आठ ते दहा आरोपींनी नमस्कार चौकातून “तू मुलीला हॉटेलवर घेऊन जातो का?’ असे म्हणून आरोपींनी काठी व रॉडने मारून गंभीर जखमी करत खून केला. दुसऱ्या घटनेत कर्मवीरनगर येथील रहिवासी शेख मोईन शेख इक्बाल यास २१ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सात आरोपींनी शेख मोईन यास खंजीर छातीत मारून व रॉडने वार करून खून केला.


