सुमित सोनोने
तालुका प्रतिनिधी,मूर्तिजापूर
मूर्तिजापूर : तालुक्यातील हिरपुर येथील लम्पी आजारामुळे आतापर्यंत पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भेतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरपूर येथील शेतकरी दीपक मेहरे यांचा बैल लम्पी व्हायरसच्या आजारामुळे शुक्रवारी दगावला.त्यामुळे येथील पशू पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.या परिसरातील बहुतांश जनावरांना औषधोपचार केला आहे,लस देऊनसुद्धा यात काही जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे.जनावरे वाचविण्यासाठी,पशुपालक धडपड करीत आहेत. हिरपुर येथे शिबिर घेण्यात यावे अशी पशूपालकांची मागणी आहे.