नवी दिल्ली : बातमीचे हेडिंग वाचून अस कुठ असतं का? आम्ही एका लग्नाने वैतागलोय, हा कुठला आलाय तूर्र्म खा..असे काहीजण म्हणतील..म्हणा.. पण ते खरय! एका व्यक्तीने त्याच्या आयुष्यात तब्बल ५३ लग्न केली आहेत. सध्या तो ६३ वर्षांचा असून पहिले लग्न त्याने वयाच्या २० व्या वर्षी केले होते. त्यावेळी त्याची पहिली बायको त्याच्यापेक्षा ६ वर्षांनी मोठी होती. सौदी अरेबियातील अबू अब्दुला यांनी हा अवघड वाटणारा विक्रम केलाय. सौदी अरेबियातील “गल्फ न्युज” या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. अबू अब्दुल्ला यांच्या म्हणण्यानुसार ह्या काही ठरवून केलेल्या गोष्टी नाहीत. जेव्हा पहिले लग्न केले तेव्हा दुसरे लग्न करण्याचा विचार नव्हता. पहिल्या बायकोपासून १ मुलगा झाला, तीन वर्ष चांगला संसार टिकला. मात्र बायकोसोबत पटले नाही, तिच्यासोबत भांडण झाले वयाच्या २३ व्या वर्षी दुसरे लग्न केले. माझ्याकडून हे सगळ नाईलाजाने झालं असही ते म्हणतात. अब्दुल्ला यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीत अनेक समस्या होत्या. मी सर्वोत्कृष्ट जोडीदाराचा शोध घेत होतो. शांतता आणि स्थिरता मिळविण्यासाठी मजबुरीने मी एवढी लग्न केली. माझा नाईलाज होता. कोणतीही गोष्ट ठरवून केली नाही असे अबू अब्दुल्ला म्हणतात. एकीशी तर त्यांनी केवळ एका रात्रीपुरते लग्न केल्याचे ते सांगतात. त्यांचे बहुतेक लग्न हे सौदी महिलांशी झाले आहेत. आता मात्र वयाची ६३ वर्षी झाली असून आता लग्न करणार नाही असे म्हणत त्यांनी माघार घेतली आहे.