अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
दि 1 जुलै रोजी कृषी दिन आणि कृषी दिना दिवशीच मालेगाव येथून जवळच असलेल्या मौजे गिव्हाकुट्येथील शेतकरी सुनील विश्वास कुटे या संबंधित शेतकऱ्यांनी किन्हीराजा कृषी सेवा केंद्रा वरून नामांकित कंपनीचे विड ब्लॉक सोयाबीन तननाशक म्हणून गट नंबर 53 मधील पाच एकर शेती वर त्याची फवारणी केली असता तण मरण्याऐवजी सोयाबीन व तूर मरण्याला सुरुवात झाली आणि बघता बघता एका दिवसांमध्येच सर्वच्या सर्व शेतच करपून जमीनदोस्त झाले असताना या संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच तालुका दंडाधिकारी मालेगाव यांच्याकडे धाव घेतली असताना संबंधित सर्व झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडून योग्य मोबदला द्यावा अशी मागणी सध्या शेतकरी वर्गाकडून होत असून गावातील पण पंचवीस ते तीस एकर शेतीवर विड ब्लॉक या तणनाशकाची फवारणी केली असताना त्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली आहे परिणामी जिल्हा कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी गावातील सर्व शेतकरी व नागरीक यांच्या वतीने तसेच बाधित शेतकऱ्यांकडून होत आहे.