अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातूर : स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळा ,कान्होबा चौक पातुर येथे श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्तानं आज दिनांक 19/08/2022 ला गोपाळकाला – दहीहांडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका कु. व्हि.एम.सरप तसेच उपस्थित महिला पालक यांचे हस्ते बाळ श्रीकृष्ण प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले.नंतर वर्ग नर्सरी ते ४ थी चे काही निवडक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी यांनी “राधा -कृष्ण ” वेशभुषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले व वेशभूषा केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच त्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे शेवटी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गोविंदा पथकाने दहीहांडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील कर्मचारी वृंद मुख्याध्यापिका सरप मॕम , देशमुख मॕम , लखाडे मॕम , डाखोरे सर , सानप सर सिरसाट सर , राठोड सर , घोरे सर , कॉन्व्हेंट टिचर सौ.राखोंडे टिचर , सौ.सातव टिचर , पोहरेताई यांनी सहकार्य केले.


