किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. खऱ्या अर्थाने देशाला कृषी प्रधान सशक्त बनवणाऱ्या भावी कृषी तंत्रज्ञ विद्यार्थी यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन जागतिक पर्यावरण दिन साजरा केला या मध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी सुद्धा मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शविली कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी नेते कृष्णा अंधारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन स्पर भाषणामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण पोषक व भावी पिढीला मार्गदर्शन करताना खऱ्या अर्थाने देशाचे वैभव कृषी तंत्रज्ञ असून वृक्ष तोड थांबवुन वृक्षांना जीवदान देणे म्हणजेच पर्यावरण समतुल राहील तरुण पिढीच्या आरोग्य निरोगी राहण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल अशा शब्दांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन स्पर भाषणामध्ये संबोधित केले या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. कृष्णाभाऊ अंधारे व सौ. हेमलताताई अंधारे उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. खरडे, प्रा. रोहीत कनोजे, कार्यक्रम समन्वय प्रा. समाधान कव्हर, , प्रा. सौरभ वर्मा, प्रा. कु. हर्षल पोरे, प्रा. कु कल्याणी , कु. सोनल खवने प्रा. कु भाग्यश्री राऊत उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.