पातुर येथे ओबीसी जागर परिषद संपन्न…
अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
पातुर : राज्याचे गृहनिर्माण तथा अल्पसंख्यांक मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पातुर येथे आयोजित भव्य ओबीसी सभेत ओबीसी आरक्षणाच्या विचारांचा जागर संपन्न झाला.ना. डॉ. जितेंद्र आव्हाड काॅल व व्हिडिओद्वारा ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, देशाच्या एकूण लोकसंख्येत ५४ टक्के लोकसंख्या ओबीसी बांधवांची असून मात्र न्याय व हक्कासाठी एकत्र येऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. हा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आहे फक्त दहा टक्के ओबीसी बंधू सोडून इतर ९० टक्के बांधव मात्र सर्व गोष्टी पासून वंचित आहेत. आता लढाई ही जीवन मारण्याच्या प्रश्नांची आहे. ते पुढे म्हणाले, इतर मागास वर्ग (ओबीसी) हा देशभर किंबहुना राज्यभर विखुरलेला असून तमाम ओबीसी बांधव एकत्रित येणे काळाची गरज आहे. बाबासाहेबांनी समतावादी व्यवस्थेचा स्वप्न पाहिलं होतं. त्यामुळे सर्व ओबीसी बांधवांच्या मनात असलेली आरक्षणाबाबतची खदखद दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन रस्त्यावर उतरले पाहिजे आणि राजकीय ओबीसी आरक्षणाची लढाई यशस्वी केली पाहिजे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे प्रसिद्ध राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक मुबीन मुल्ला (आष्टेकर) म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींसाठी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्याची जाणीव ओबीसीना राहिली नाही बाबासाहेब आंबेडकर आणि कलम 340 मध्ये ओबीसींसाठी तरतूद करून ठेवली होती त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले पण मूठभर लोकांनी ते आरक्षण काढून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत अशा मनुवाद्यांना जर थांबवायचे असेल तर आपण राज्याचे गृहनिर्माण अल्पसंख्यांक मंत्री नामदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरू आणि आरक्षण मिळवू ओबीसी समाज हा बारा बलुते दार आणि अठरा पगड जातींच्या आहे त्यांना न्याय मिळवण्यासाठी ही धडपड करावी लागत आहे हेच मोठे दुर्दैव आहे ज्या देशात कुत्र्या-मांजराची वाघांची जनगणना होते पण ओबीसी बांधवांची जनगणना होत नाही हे सर्वात मोठे दुर्दैव आहे त्यासाठी आपण एकत्र येऊन लढले पाहिजे. ओबीसी बांधवासाठी सुरू असलेली जागर सभा खऱ्या अर्थाने प्रबोधनाचे व ओबीसी बांधवांना योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहे अशा प्रकारचे त्यांनी गौरवोद्गार काढले.या ओबीसी जागर सभेत समता परिषदेचे सदाशिव शेळके यांनी बोलताना म्हणाले, ओबीसी बांधवावर सातत्याने अन्याय झालेला आहे. आता जाणीपूर्वक ओबीसींच्या राजकीय आरक्षण बंद करण्याचं कटकारस्थान सुरू आहे. त्यामुळे नामदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी बांधवांना एकत्रित आणून रस्त्यावरची लढाई जिंकण्याचा मानस आहे.श्रीराम पालकर, म्हणाले, अनुसूचित समाजामधील विविध जातीने एकत्रित येऊन आपलं आरक्षण टिकविण्यासाठी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ या बाबासाहेबांच्या विचारांना अमूर्त स्वरूप देण्याचे काम या बांधवांनी केलं. तरी ओबीसी बांधवांनी याच न्याय व कृतीप्रमाणे आपलं स्थान व आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. यावेळी कृष्णा अंधारे, शंकर बोचरे, डाॅ. मदन नालिंदे, हिदायत खान रूम खान आदींनी आपले विचार व्यक्त केले.मो फरहान अमीन यांनी या कार्यक्रमाचे स्वागत राहुल वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. या सर्व परिषदेचे नेटके नियोजन सय्यद फैजान व फ्रेंड्स फौंडेशन, पातुर यांनी केले.या कार्यक्रमास पातुर शहरातील व तालुक्यातील मान्यवर नेते मंडळी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सैय्यद फ़ैज़न, फरहान अमीन,रफ़ीक़ काज़ी, सै वाजिद,ऐड फ़ैज़, मो मुसब, मो ज़ैद, अरसलान खान, खिज़र खान, अदनान खान, सादिक शाह, अज्जू शाह, मोहसिन खान,रज़ा फरदीन खान, मुश्फिक खान आदिने प्रयत्न केले.