महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि. 31:- भद्रावतीचे तहसीलदार सोनवणे यांच्यावरील हल्ला प्रकरणी आरोपींना 13 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी भदावती तालुक्यातील चंदनखेडा परिसरात अवैध रेती पकडण्यासाठी गेलेल्या भद्रावती चे तहसीलदार यांच्यावर ट्रॅक्टरचे धडक मारून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना 13 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आरोपी ट्रॅक्टर मालक विलास पांडुरंग भागवत व ट्रॅक्टर चालक ज्ञानेश्वर ननावरे अशी आरोपींची नावे आहेत.
दिनांक 28 ला भद्रावती चे तहसीलदार अनिकेत सोनवणे, नायब तहसीलदार भांदककर व अन्य कर्मचारी चंदनखेडा परिसरात रेती माफियावर कारवाई करण्यास गेले असता त्यांनी तहसीलदारांच्या गाडीला मागून धडक देऊन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता .यातील आरोपींना पोलिसांनी अटक करून भद्रावती पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली.