किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर ( प्रतिनिधी)- स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई देमशपांडे वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळा कान्होबा चौक पातूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र पातूरच्या वतीने नुकतेच कोविड -19 लसीकरण शिबिराचेआयोजन करण्यात आले होते. याशिबिरामध्ये 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.या शिबिराचे विशेष म्हणजे पातुर तालुक्यातून 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची सुरुवात प्रथमत: याच विद्यालया पासून करण्यात आली होती.या शिबिरामध्ये लक्ष्मीबाई देशपांडे विद्यालयातील एकूण 39 विद्यार्थ्यांनी कोविड-19 लसीकरणाचा लाभ घेतला .सदर लसीकरण शिबिर हे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव तसेच, डॉ. चिराग रेवाळे वैद्यकीय अधिकारी पातुर, डॉ. डाखोरे प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले.तसेच हे लसीकरण शिबिर प्रत्यक्ष राबवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पातूरचे विकास जाधव ,नितीन जाधव , कु.भारती सुरवाडे स्टाफ नर्स ,हर्षा खडसे स्टाफ नर्स,राजेश शिंदे आरोग्य पर्यवेक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सरप तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.