महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि. 25:- सहकाराला सामाजिक कर्जाची जोड देऊन सर्वसामान्य घटकांचा आर्थिक आणि सोशल बॅकींग राबवून सर्वसामान्य घटकांच्या हितासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या बुलढाणा अर्बन बँकेच्या भद्रावती शाखेकडून मयत कर्जदारांच्या वारसाला अपघाती विमा धनादेशाचे वितरण करण्यात आले.भद्रावती येथील संजीत देवनाथ बँकेच्या भद्रावती शाखेतून ५८ हजार रुपयांची सुवर्ण तारण कर्ज घेतले होते. दरम्यान संजीत देवनाथ यांचा मोटार सायकल दरम्यान अपघातात अपघाती मृत्यू झाला.सदर बँकेच्या वतीने सभासदांच्या ठेविचा विमा काढण्यात येत असतो. सदर दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शाखा व्यवस्थापक शशीकुमार रोडे यांनी देवनाथ परिवाराची भेट घेऊन चंद्रपूर विभागीय व्यवस्थापक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विमा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर केला. त्यानंतर भद्रावती शाखा कार्यालयात एका छोट्याशा कार्यक्रमात विभागीय व्यवस्थापक राहुल देशपांडे यांच्या हस्ते स्व.संजीत देवनाथ यांच्या वारसदार पत्नी श्रीमती दिपाली देवनाथ यांना ६३ हजार ८८० हजारांचा धनादेश वितरीत करण्यात आला.याप्रसंगी बँकेचे विभागीय व्यवस्थापक राहुल देशपांडे अन्य सभासद व ग्राहक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा व्यवस्थापक शशीकुमार रोडे, बळवंत क्षीरसागर, आशिष झुरमुरे, nn निकेश नन्नावरे, संदीप मांढरे आदी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.