क्रांतीकारक शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना श्रद्धांजली
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि. 25:-दि.23 मार्च 2022 रोजी भीम आर्मी भारत एकता मिशन च्या वतीने भारतीय लढ्याला क्रांतिकारी वळण देणारे महान क्रांतीकारक शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्च 1931 रोजी क्रूर जुल्मी हुकुमशाही ब्रिटीश
सरकारने या दिवशी फाशी दिली होती.या निमित्य स्थानिक टिळक वार्ड येथील भीम आर्मी भारत एकता मिशन तालुका प्रमुख शुभम गवई यांच्या नेतृत्वात तिन्ही शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थिती जि.प.मुख्याध्यापक विठ्ठल वखणोर सर,डॉ.उमक सर, भीम आर्मी भारत एकता मिशन कार्यकर्ते संदीप शेंडे,सुयोग्य दुर्योधन, राहुल अनकर, विशाल भोयर, चेतक मत्ते आदी टिळक वार्डातील नागरिक मित्र परिवार उपस्थितीत होते.