किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर – दि : २५ मार्च २०२२ स्थानिक डॅा. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दि २३ मार्च ते २९ मार्च २०२२ या कालावधीत जि. प. प्राथ शाळा खानापुर येथे आयोजीत केले आहे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॅा किरण खंडारे होते. याप्रसंगी विचार पिठावर दिनेश ठाकरे, सुधीर देशमुख, सुनिता देशमुख, सरपंच खानापुर,विक्रांत शिरसाट, उपसरपंच खानापूर, सुनिताताई टप्पे, पंचायत समीती सदस्य, कार्यक्रम अधीकारी प्रा.राहुल माहुरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॅा.दिपाली घोगरे, सह कार्यक्रम अधिकारी प्रा.अरविंद भोंगळे, महिला सहकार्यक्रम अधिकारी प्रा. विजया साखरे उपस्थीत होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व हारार्पन करण्यात आले.त्यानंतर आरती सरप या विद्यार्थीनीने स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत केले.उद्घाटकीय भाषनात गुलाबराव पाटील यांनी सर्वप्रथम विशेष शिबीराचे उद्घाटन झाले असे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी सांगितले की,शिबिरांमधून विद्यार्थ्यांनी स्वावलंबन, श्रमसंस्कार ही मूल्ये आत्मसात करत असतांनाचं सेवाभावी वृत्ती विकसित करावीत. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये हे गुण विकसित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी बौद्धिक व उद्बोधन पर कार्यक्रमांतून चारित्र्य संवर्धनासाठी मौलिक असे संदेश आत्मसात करावेत असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल माहुरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी शिबीराची भूमिका आणि सात दिवस राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहीती दिली.
त्यानंतर दिनेश ठाकरे यांनी शुभेच्छापर भाषण दिले.आणि शिबिराला शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषनात प्रभारी प्राचार्य डॅा किरण खंडारे यांनी सांगितले की, या शिबिरात स्वयंसेवकांनी स्वत:ला झोकून देऊन काम करावे. तसेच गावकरी आणि स्वयंसेवकांचे सामाजिक भान जागृत करावे. या शिबिरातून जीवन जगण्याचे कौशल्य प्राप्त होत असते व व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते.असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रियंका उपर्वट हिने तर आभारप्रदर्शन शिवानी महल्ले यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सहकार्यक्रम अधिकारी प्रा.अरविंद भोंगळे, प्रा. एच.ए. एकबोटे, प्रा.अनिल देशमुख, प्रा.नलिनी खोडे, प्रा. संगीता तेलगोटे, प्रा.कविता मोरे, प्रा.मिलिंद वाकुडे,प्रा.शिवकुमार बायस,अशोक पांडे व सर्व एन. एस. एस स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.