अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे दि. 20 मार्च 2022, सां. 5 वाजता पासुन स्थळ : मेडशी तांडा बंजारा समाज फाउंडेशन मेडशी च्या वतीने अकोला जिल्ह्यातून आलेल्या श्री वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना पथकाद्वारे होळी निमित्त बंजारा समाजातील लोकगीत व लोकनृत्याचा विशेष कार्यक्रम ( लेंगी ) चे आयोजन केले होते. सर्वप्रथम मेडशी तांड्या चे ज्येष्ठ नायक श्री गिरधारी रावजी राठोड व श्री वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. विजय भाऊ जाधव यांच्या वतीने संत श्री सेवालाल महाराज व श्री वसंतरावजी नाईक साहेबाच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन केले .
या नंतर श्री वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना अकोला जिल्हा लेंगी पथकाचे अध्यक्ष डॉ विजय जाधव यांचे व पथकातील इतर सदस्यांचा रुमाल, टोपी व नारळ देऊन सत्कार करण्यात आले. व सोबतच मेडशी तांडा येथील सांस्कृतिक वारसा जपणारे श्री नंदू गोलसिंग राठोड व अनिल चव्हान व तसेच ग्रापंचायत सदस्य श्री मुलचंद चव्हान , व नुकतेच सेवा सहकारी संस्था मेडशी येथील नवनिर्वाचित सदस्य श्री रागा राठोड व श्रीमती सुनिता धर्मराज चव्हान यांचे सुद्धा सत्कार करण्यात आले.
अशा प्रकारच्या कार्यक्रमचे अयोजन करण्याचा एकमेव उद्देश म्हनजे बंजारा समाजाचा सांस्कृतिक वारसा जपणे आहे. या कार्यक्रमाला मेडशी तांडा व गावातील प्रतष्ठित व्यक्ती व पत्रकार बंधू सुद्धा मोठया संख्येने उपस्थित राहल्यामुळे बंजारा समाज फाऊंडेशन च्या वतीने मन:पूर्वक आभार मानले आहे.