महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.२२:-राष्ट्रीय हरीत सेना आणि स्व.मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात जागतिक वन दिन नुकताच
साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर व परिक्षेत्र चंद्रपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एम.जी.रामटेके, पोतराजे, रोतकर उपस्थित होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक एम.एन.सातभाई यांनी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन मानवी जिवन समृद्धी साठी आवश्यक या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एम.एस.बरडे यांनी केले. संचालन मनीष वाकडे यांनी केले. तर आभार येलकर यांनी मानले. कार्यक्रमाला पंढरी हनवते, महेश केदार आणि विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.