गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-नुकत्याच झालेल्या अकोला जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या गुणात्मक मूल्यांकनात तेल्हारा पोलिस स्टेशन हे प्रथम आले आहे. त्यामुळे तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमधील कार्याच्या आढाव्यामध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण व कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या कार्यात तेल्हारा पोलिस स्टेशन हे प्रथम आले आहे. दरम्यान, ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी याचे श्रेय माझे एकट्याचे नसून माझे सर्व सहकारी अधिकारी, पोलिस चमू आणि शहरातील नागरिकांचे असल्याचे मत व्यक्त केले
काही महिन्यांपूर्वीच रुजू झालेले ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी विविध मोठ्या प्रकारच्या कारवाया व अवैध धंद्यांना लगाम लावण्यात यश मिळविले आहे.










