विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : भारतातील पहिली राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल चे यांचे दरवर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहे.यंदाचा मधुकर लोंढे ससेमिरा स्मृर्ती राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकार राहुल कुलट यांना जाहीर झाला आहे.
राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना AJFC हे मागील दोन दशकांपासून पत्रकारांसाठी काम करत असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणारी पहिली संघटना आहे. दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांमधील यंदाचा पुरस्कार सोहळा हा मालाड मुंबई येथे 27 मार्चला होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील सहा पत्रकारांना पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामध्ये विदर्भातून पत्रकार राहुल कुलट यांना मधुकर लोंढे ससेमिरा स्मृर्ती पुरस्कार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार अभिमन्यू लोंढे यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार, सातारा जिल्ह्यातील अतुल होनकळसे यांना नानासाहेब जोशी स्मृती पुरस्कार, रत्नागिरी येथील युयुत्सु आर्ते यांना शरददादा बोरकर स्मृती पुरस्कार, सोलापूर जिल्ह्यातील गणेश गोडसे यांना नवीनचंद्र सोष्टे स्मृती पुरस्कार, रायगड जिल्ह्यातील गणेश कोळी यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. ऑल जर्नालिस्ट फ्रेड सर्कल म्हणजेच राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या 2022 यावर्षीच्या पुरस्कार कर्त्यांची नावे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार, तसेच प्रदेश कार्यकारिणीतील सदस्यांनी प्रसिध्द केली.